Monday, May 23, 2011

भारत आणि श्रीलंका वर्ल्ड-कप फ़ायनल मँच मध्ये कोणाची सरशी होईल





भारत आणि श्रीलंका वर्ल्ड-कप फ़ायनल मँच मध्ये कोणाची सरशी होईल असा प्रश्न एका क्रिकेट रसिक जातकाने मला विचारला होता.
या प्रश्नासाठी मला २६२ नंबर जातकाने दिला होता. त्याची प्रश्न नवमांश कुडंली खालील प्रमाणे आहे.
मी प्रथम प्रश्न नवमांश कुडंलीचे पहिले घर खालील प्रमाणे काढले.
२६२ ला १२भागुन आलेली बाकी १० आली या प्रमाणे प्रश्न नवमांश कुडंली मांडलेली आहे.
मी या प्रश्ना साठी खालील प्रमाणे नियमलावला:
जर प्रश्न नवमांश कुंडलीचा षष्ठेश जर प्रश्न कुंडली मध्ये ६ आणि ११ या स्थानाचा कार्येश असेल व तसेच प्रश्न नवमांश कुंडलीचा ११ व्या
स्थानाचा मालक जर प्रश्न कुंडली मध्ये ६ किंवा ११ व्या स्थानाचा कार्येश असेल तर प्रतिस्पर्धी संघावर मात करुन (भारताला) यश प्राप्त होईल हे ऊघड होते.
तसेच या नियमानुसार प्रश्न नवमांश कुंडलीचा षष्ठेश बुध असुन तो
तत्कालिन प्रश्न नवमांश कुंडलीचा षष्ठ स्थानाचा मालक बुध असुन तो प्रश्न कुंडलीमध्ये षष्ठ स्थानात असुन तो ११ व्या स्थानाचा मालक आहे. व तसेच प्रश्न नवमांश कुंडलीचा लाभेश मंगळ असुन तो शनिच्या नक्षत्रात आहे व हा शनि प्रश्न कुंडली मध्ये लाभ स्थानात आहे.
(ज्यावेळेला दोन पेक्षा जास्त ग्रह वक्री असतात त्यावेळेस वक्री ग्रहांचा नियम लागू होत नाही.)
वरील नियमाची पुर्ती होऊन त्यामुळे मी पटकन त्या क्रिकेट रसिक जातकाला सांगितले की भारताचा विजय होईल हे भाकीत मी ३१/३/११ ला त्याला सांगितले त्यानुसार २/४/११ ला भारत श्रीलंका वर्ल्ड-कप फ़ायनल मँच खेळली गेली आणि शेवटी भारताच्या पारड्यात विजश्री पडली. या अगोदर सेमी फ़ायनलचे मँच मध्ये भारत विरुध्द पाकिस्थान यात कोण फ़ायनला जाईल हे सुध्दा त्यावेळी मांडलेल्या प्रश्न नवमांश कुंडलीवरुन सांगितले होते. ती कुंडली आपण केव्हा तरी पुढे बघु........!

2 comments:

subhash said...

Blog khup avadala.aplyala samparka karnyasathi blog madhe email id kinva phone no dilela nahi.please te kalva.

Unknown said...

pls vishkanya yoga manje kay te sanga na email id - namrata.jadhav99@gmail.com